Leave a comment

Changing Primary Health Care


image

image

image

Recently visited a PHC Adhalgaon near Shrigonda in a remote area Ahmednagar district. It was really nice experience always to go into peripheral area. The environment smells differently and takes us closer to the rural India.

The purpose of the visit was to meet and interact with the health staff working at grassroot level and primary health centre.  It was too late to reach there but at last managed to reach.

The warm welcome given by the Dr. Shaila Dange and her team was overwhelming.

It is really a ideal primary health centre set up with all the facilities needed at PHC level. Neat and clean with and expert medical officer and staff available for promt and efficient medical service. They have indoor facility, labarotary, small operation theater, adequate medicine supply. 

Usually at villege level many a times it becomes difficult to maintain the cold chain of vaccines, but at Adhalgaon they have installed solar inverter and battery setup so that the need for electric supply can be fulfilled easily and cold chain can be maintained uninterruptedly. Thus we can say that it’s a green PHC.

The main aspect I came to know that along with this the team of the PHC is having a strong communication network within them.

They are using the smartphone technology effectively. Through the group communication on application like wats app, the ANM and health workers at sharing the information and messages regarding the performance and work. That is helping the medical officer to monitor and supervise the work of the staff as all are available at finger tip through the mobile technology round the clock.

It is believed that if you want to development you need to improve the communication and transportation system. And yes,  here in a rural area as the reach of the modern communication technology is increasing the change is coming. The pace may be little slow at the initial stage as it takes time to familier with the modern methods of communication. People are learning and using the technology according to there capacity.  In near future when the communication will become more faster the development process will take its momentum.

Advertisements
Leave a comment

बदलती माध्यमे बदलते श्रोते ,


मुळात जे शीर्षक दिलंय ना ते जरा अपूर्ण वाटते आहे, कारण माध्यमांना प्रतिसाद देणारा किंवा माध्यमामध्ये होणाऱ्या बदला नुसार  बदलणारा श्रोता, किंवा दर्शक -प्रेक्षक यात अभिप्रेत आहे.

ते कसे … नुकतेच मी माझ्या प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्याला विचारले अरे माझे व्याख्यान कधी आहे.  मला अपेक्षित होते की त्याने त्याची वही उघडावी आणि सांगावे, त्याने टेचात आपला स्मार्ट फोन काढला आणि त्यातून त्याने वेळापत्रकाचा फोटो बघून मला वेळ सांगितली. एवढेच काय माझ्या लक्षात आले की या महाशयांनी सर्व नोट्स आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून साठवून ठेवल्या आहेत.

दुसरे उदाहरण… झी खाना खजाना या वाहिनी वर कार्यक्रम बघत होतो, कार्यक्रम सुरु होता, माझ्या डोळ्या समोर जुनी दृश्ये तरळून गेली. असा कार्यक्रम असला की आई, वही पेन घेऊन बसायची आणि मग कार्यक्रम संपे पर्यंत पूर्ण रेसिपी लिहून काढायची. हे आठवत असताना कार्यक्रम संपला आणि लगेच टीवी स्क्रीन वर क्यू आर कोड झळकला आणि सूचना ऐकू आली, ये रेसिपी पढने के लिये अपने स्मार्ट फोन से टीवी स्क्रीन पे दिखाया दिया क्यू आर कोड स्केन करे .

आणि आज आमच्या मित्राने पाठवलेला फेसबुक वरचे कार्टून मुलगा शिक्षकांना विचारतोय आईने विचारले आहे, होम वर्क वाटस ऐप वर पाठवणार का?

10835102_10153579473151102_7131481347493685523_o

माध्यमांमधील प्रगतीने आपल्या श्रोत्यांमध्ये आमुलाग्र बदल होत चालला आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने माध्यमांचा अधिकाधिक उपयोग करू लागला आहे. मग तो विध्यार्थी असो किंवा गृहिणी, व्यापारी असो नाही तर सरकारी नोकरदार. रोजचे दैनदिन व्यवहार अधिक सोपे होऊ लागले आहेत. निसंशय बदल चांगला आहे, आणि तो आपण स्वीकारायला हवा पण हे करतांना आपण लेखन कला, किंवा नोंदी ठेवणे, हे विसरत तर नाही जाणार ना, याचेही भान ठेवायला हवे. कारण लेखन करताना आपण वाचून ऐकून  लिहीत असतो. त्यामुळे प्रसंगी आपण केलेली नोंद सापडली नाही, अचानक गहाळ झाली तरी आपण प्रत्यक्ष लिहिलेले असल्याने आपल्या ते स्मरणात असते, पूर्ण नाही तरी अंशतः आठवते. तेवढेही अनेकदा आपली कामे पार पाडायला पुरेसे ठरते. पण  फक्त तंत्रज्ञानच्या आधारे आपण जर कामे करायला लागलो तर मात्र अडचणीत पडू शकतो.

Leave a comment

आइडिया की कल्पना


आजकल टीवी  पर आइडिया की इन्टरनेट की सुविधा के बारे में विज्ञापन चल रहे हैं । इन विज्ञापनों में भारत के विभिन्न क्षेत्रों में महिलाओं, युवाओं, तथा अन्य लोगों को जो अनुचित प्रथाओं और रिवाजों के चलते शिक्षा लेने के अधिकार से वंचित रहते हैं, उन्हें कैसे आइडिया इन्टरनेट के माध्यम से शिक्षा पाना संभव है यह दिखाया जा रहा है। विज्ञापन कर्ताओं की कल्पना की दाद देनी होगी, उन्होंने इन अनुचित प्रथाओं तथा रिवाजों का उपयोग अपने विज्ञापनों में बहुत ही अच्छे तरीके से किया है।

विज्ञापन के माध्यम से पहले भी समाज में व्याप्त बुराइयों पर कटाक्ष करने का सफल प्रयास किया जा चुका है, सवाल यह है की  क्या हमारे समाज के समक्ष आने वाली इन बुराइयों को दूर करने के प्रयास हम करने वाले हैं या नहीं? आज जब इन्टरनेट और स्मार्टफोन जैसी तकनीकों की वजह से  सामाजिक अभिसरण बढा है, हम सबकी  यह  जिम्मेदारी बनती है कि  समाज के उस तबके तक शिक्षा जैसे मौलिक अधिकारों को लेकर जाए।

Leave a comment

भुर्रकन उडून जा…


मध्यंतरी गुगल च्या ग्रुप वर एका मैत्रिणीने, आपल्या आयुष्यात गाणं म्हणूण जे काही आपल्या आईने ऐकवलेलं असते अशा काही सुमधुर बालगीत  शेअर केले.

झोळीत किवा पलंगावर उबदार पांघरुणात आसमंता कडे भिरभिरत्या नजरेने पाहणारे बाळ आपल्या आजूबाजूच्या जगाशी हळूहळू परिचित होत असताना.. निसर्गाशी ओळख करून देणारे. . चिऊ चिऊ ये सारखे चार ओळींचे गाणे कानावर पडते  ,

चिउ चिउ ये
दाणा खा
पाणि पी
भुर्र्रर्रर्र उडून जा ….

आई खिडकीत चिवचिवत असलेल्या चिमणीची ओळख करून देते…….

कदाचित त्याला ती हे हि सुचवते का जसा या चिऊ सारखा तू आलायस……

दाणे खाणार, पाणी पिणार… आई बाबाच्या छायेत वाढणार आणि एका दिवशी भुरकन निघून जाणार….

तसेच काहीसे या मोराच्या गाण्याच्या बाबतीत नाहीका…

इथं इथं बैस रे मोरा
तान्हं बाळ घालतंय चारा…
चारा खा, पाणी पी
भुरर्कन उडून जा…

अतिशय सूचक शब्दात आई त्याला धडा तर  देत नाहीये?

बाबारे तुझ्या सहवासात जो कोणी येणार आहे तो फक्त क्षणकाल राहणार आहे…

आपल्या वाटेचे चार पाणी घेऊन तो पुन्हा आपल्या वाटेने निघून जाणार आहे…

——————————————————————–

1 Comment

नमस्कार मित्रानो !


श्रुतीस्मुर्ती या माध्यमातून लहानपणा पासून ऐकलेल्या आणि स्मरणात राहिलेल्या गोष्टी सोबतच…आजकाल च्या जगात घडणाऱ्या, ऐकण्यात येणाऱ्या गोष्टी विषयी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. या काहीशा वैयक्तिक असल्या तरी कुठे तरी त्या समाजमनाशी जवळीक साधणाऱ्या असणार आहेत.. कारण या समाजाचा मी एक अविभाज्य भागच आहे ना..